spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहरात दिसला भक्ती, श्रद्धा अन् संस्कृतीचा भव्य संगम

– महापौरांसह समस्त पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’चा प्रारंभ

नागपूर :- आकर्षक रांगोळी, मन प्रसन्न करणारी आरास आणि मंत्रोच्चाराच्या स्वरांनी महाल येथील कल्याणेश्वर मंदिर परिसर उजळून गेला, केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालय, आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या निर्देशानुसार, नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अटूट आस्था की गौरव गाथा’ या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा भव्य संगम सोमवारी (ता.११) सकाळी नागपूरकरांनी अनुभवला. यावेळी मातृशक्ती द्वारा भगवान शिव चे रुद्राभिषेक करण्यात आले.

महापौर निता ठाकरे, आमदार प्रवीण दटके, उपमहापौर लिला हातीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर  दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थित सोमनाथ स्वाभिमान पर्व चा भव्य प्रारंभ झाला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटनेत्या आभा बिज्जू पांडे शिवसेना गट नेते गणेश चार्लेवार, गांधीबाग झोनच्या सभापती  उमा देशमुख, नगरसेवक  सुधीर राऊत, महिला व बाल कल्याण विशेष समिती सभापती सारिका नांदुरकर, आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती सरिता कावरे, अग्निशमन विशेष समिती सभापती रुपाली ठाकूर, क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शना धवड, शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लढ्ढा, नगरसेवक सचिन नाईक, नगरसेविका वैशाली उदापूरकर, नगरसेवक  श्रीकांत आगलावे नगरसेवक विजय होले, नगरसेवक रामभाऊ आंबुलकर, नगरसेवक  मनोज साबळे, नगरसेविका साधना बरडे, नगरसेवक  सुनील हिरणवार, नगरसेवक लखन येरवार, नगरसेवक विनोद कन्हेरे, नगरसेवक विनोद बघेल, नगरसेविका पूजा पाठक यांच्यासह इतर नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह मनपाचे उपायुक्त मंगेश खवले आणि क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वाच्या उपस्थितीत कल्याणेश्वर मंदिर भव्य पूजा करण्यात आली.

सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या या पर्वानिमित्त कल्याणेश्वर मंदिर भक्तिमय गीत-भजन, ११ हजार ‘ॐ नमः शिवाय’ जप तसेच रुद्र अभिषेक करण्यात आला. यावेळी महिलांनी पौरोहित्य केले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील सोरटी सोमनाथ येथे केलेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करतांना महापौर निता ठाकरे म्हणाल्या की, भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशामध्ये सोमनाथ मंदिराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. परकीय आक्रांतांनी देशाच्या धार्मिक संस्कृतीवर आघात केल्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोमनाथ मंदिर, स्वातंत्र्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुळे झाले. त्याघटनेला आज ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज शहरातील प्राचीन आणि भक्तांच्या भक्तिभावाचे श्रद्धेचे स्थान असणाऱ्या महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात हे पावन पर्व साजरे करण्यात आल्याचा मला आनंद आहे. देशाची विश्वगुरू होण्याकडे वाटचाल ही सनातनाशिवाय पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगत महापौरांनी समाजाला चांगली दिशा देण्याचे महिलांमध्ये निसर्गतःच गुण असतात, अशी एक चांगली दिशा आजच्या कार्यक्रमात महिलांनी केलेल्या पौरोहित्याचे मध्यातून दर्शविली असल्याचेही सांगितले.

तर माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी संपूर्ण देशात सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरे होत असल्याचे सांगत यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कल्याणेश्वर मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे, यामुळे नागपूरच्या प्राचीन मंदिराला नवीन वैभव प्राप्त होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना सांगितले. देशाचा इतिहास जिवंत राखण्यासाठी आणि त्याची माहिती नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष सोनी यांनी केले, तर आभार सारिका नांदुरकर यांनी मानले.

भजनाने झाले वातावरण भक्तिमय

सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या या पर्वानिमित्त कल्याणेश्वर मंदिर भक्तिमय गीत-भजन सादर करण्यात आले. यावेळी श्री गुरु भजन मंडळ, उत्साही भजन मंडळ रुक्मिणी भजन मंडळ, आदिशक्ती भजन मंडळ, माऊली भजन मंडळ, विठ्ठल रुख्मिणी भजन मंडळ यांनी भक्तिमय भजन सादर केले.

Popular Articles