कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील नाग मंदिर समोरील आरोपी नितीन संतोष वार यांच्या राहत्या घरी गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून या कारवाई दरम्यान यातील आरोपी हे आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता इलेक्ट्रिक संसाधनांच्या आधारे गुजरात टायटन विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यावर लाईव्ह क्रिकेट मॅच तसेच ऑनलाईन बेटिंग करून खायवाली करताना आढळून आले .या धाडीतून इलेक्ट्रॉनिक वस्तू ,मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 3 लक्ष 6 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नितीन रवींद्र संतोषवार वय 40 वर्षे रा भूषण नगर रणाळा ,नीतेश शैलेश शर्मा वय 26 वर्षे रा जुनी ओली कामठी व ओमप्रकाश नामक आरोपी असे तीन आरोपी विरुद्ध कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा सह कलम 66बी,आय टी कायद्यांनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
रणाळ्यातील क्रिकेट सट्टा अड्यावर पोलिसांची धाड,3 लक्ष 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.