spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामठी नगर परिषद ने विशेष मोहिम राबवावी – काशिनाथ प्रधान

कामठी :- महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने दिनांक 25 मार्च 2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत 1 जानेवारी 2022 पर्यंतची शासकिय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कामठी शहरातील पात्र नागरिकांना न्याय मिळावा व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी कामठी नगर परिषद प्रशासनाने तात्काळ विशेष मोहीम राबवावी अशी मागणी कामठी नगर परिषद चे विरोधी गट नेता व नगरसेवक काशिनाथ प्रधान यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.

कामठी शहरात विविध धर्मीय नागरिक बऱ्याच वर्षापासून वास्तव्यास असून बऱ्याच नागरिकांना संबंधित जागेची अधिकृत मालकी नसल्यामुळे या नागरिकांना घरकुल योजना ,शासकीय सुविधा व विविध विकास योजनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.मात्र राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे अश्या नागरिकांना त्यांच्या वास्तव्यास असलेल्या जागाचे नियमितीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे कामठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून नागरीकाच्या घराचे अतिक्रमण नियमानुकूल करावे वास्तविकता गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब व सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या घरावर कायदेशीर हक्क मिळणे अत्यंत आवश्यक आहे.शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शहरातील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल.अशी प्रतिक्रिया कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक काशिनाथ प्रधान यांनी प्रस्तुत प्रतिनिधी कडे व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.