– OUT OF SYLLABUS प्रश्नामुळे विद्यार्थ्यांचा संताप अनावर!
– सिविल इंजीनियरिंग विद्यार्थ्यांसाठी ४ BONUS गुणांची जोरदार मागणी: प्रवीण कळंबे
– प्रकरण थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले!
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) मार्फत दि. ०४ मे २०२६ रोजी, घेण्यात आलेल्या K SCHEME CIVIL ENGINEERING 6TH SEMESTER च्या “MAINTENANCE AND REPAIR STRUCTURE” विषयाच्या परीक्षेत OUT OF SYLLABUS प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सदर पेपरमधील प्रश्न क्र. ३ (D) हा अधिकृत अभ्यासक्रमाच्या बाहेरील असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. अचानक आलेल्या या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला असून त्यांच्या निकालावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या गंभीर प्रकाराविरोधात शिवसेना ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष व पूर्व विदर्भाचे अध्यक्ष प्रवीण डी.कळंबे यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. संबंधित OUT OF SYLLABUS प्रश्नासाठी सर्व विद्यार्थ्यांना ४ गुण बोनस स्वरूपात देण्यात यावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या निवेदनाच्या प्रती थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांना सुद्धा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता राज्यस्तरावर पोहोचल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे.