spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर मुंबईत बैठक 22 मे रोजी

नागपूर :- स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेड आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांकडून कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या कथित मनमानी, वेतन थकबाकी तसेच इतर प्रलंबित प्रश्नांबाबत येत्या २२ मे रोजी मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. तांत्रिक ॲप्रेंटीस, कंत्राटी कामगार (कर्म.) असोसिएशनच्या पाठपुराव्यानंतर कामगार उपआयुक्त (ग्रा.वि.) मुंबई यांनी ही बैठक बोलावली आहे. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने हि बैठक आयोजित करण्यात आली असून २२ मे रोजी, दुपारी ३ वाजता. समिती सभागृह, चौथा मजला, कामगार आयुक्त कार्यालय कामगार भवन, मुंबई येथे होणार आहे. संघटनेच्या निवेदना नुसार, स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेड आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांना महावितरणच्या राज्यातील ३२९ उप केंद्रांवर कंत्राटी कामगार पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र, स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेड व क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड कडून डिसेंबर २०२५ पासून आजपर्यंत कंत्राटी कामगारांचे वेतन अदा करण्यात आले नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे शेकडो कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, वाशीम येथील स्व. रामभाऊ बोरकर यांच्या निधना नंतरही संबंधित लाभ देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. याशिवाय कंत्राटी कामगारांना पे-स्लिप दिली जात नसल्याची, काही एजन्सीकडून दरमहा १५०० ते २००० रुपये वेतनातून जबरदस्तीने परत घेतले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच ईएसआयसी मध्ये कामगारांच्या कुटुंबीयांची माहिती अद्ययावत नसल्याने वैद्यकीय लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे. वाशीम, अकोला, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, भंडारा आणि गोंदिया आदी मंडळांमध्ये कंत्राटी कामगारांना सुरक्षा साहित्य (टी अँन्ड पी) उपलब्ध करून दिले जात नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आदी प्रश्नावर चर्चा होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस प्रदिप पाटील, राज्य उपाध्यक्ष नितिन भैय्या चव्हाण, राहिल शेख, धिरज घायवट, उप सरचिटणीस अतुल पाटील, दत्तात्रय रायकर, राज्य सचिव विक्रम वाकचौरे व अजित दजगुडे, राज्य संघटक प्रताप खंदारे, कोषाध्यक्ष राम पाटील यांनी दिली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.