नागपुर २५ : पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत राहणारा सराईत आरोपी नामे अभिनेष उर्फ अभिषेक देवशंकर वर्मा, वय २७ वर्षे, रा. वार्ड कं १ येरला हा पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुंड असुन परीसरात गुंडगिरी करतो. त्यांचे विरूध्द अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. तसेच तो गांजा विक्रीचे अवैध व्यवसायात सकीय आहे त्याच्या असमाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करून दहशत पसरवित असतो. नागपुर ग्रामीण पोलीसांना त्याचे विरूध्द जेव्हा जेव्हा तकारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवुन त्याचे विरुध्द गुन्हे नोंद करून त्याला अटक केले आहे. आरोपी नामे अभिनेष उर्फ अभिषेक देवशंकर वर्मा, वय २७ वर्षे, रा. वार्ड कं १ येरला याचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु आरोपी अभिनेष उर्फ अभिषेक देवशंकर वर्मा, वय २७ वर्षे, रा. वार्ड कं १ येरला याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली. आरोपीचे कृत्य समाजिक सुव्यवस्थेला बाधक तरत असल्याने हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर पोलीसांकडुन एम.पी.डी.ए. कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. दिनांक १८/०७/२०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी, नागपुर यांनी सराईत गुन्हेगार नामे अभिनेष उर्फ अभिषेक देवशंकर वर्मा, वय २७ वर्षे, रा. वार्ड कं १, येरला याचे विरूध्द स्थानबध्दतेता आदेश काढला असुन तेव्हा पासुन नमुद आरोपी हा मिळुन येत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने नमुद आरोपीचा शोध घेवुन त्यास दिनांक
२३/०७/२०२५ रोजी आदेश तामील करून त्याला मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे दाखल केले आहे.
नागपुर ग्रामीण जिल्हा पोलीसांनी दुसऱ्यांदा गांजा विकीचे अवैध व्यवसायात सकीय असणाऱ्या सराईत आरोपीवर एम.पी.डी.ए कायदया अंतर्गत कारवाई केली आहे. यापुर्वी महाराष्ट्र राज्यात पहील्यांदाच गांजा विक्रीचे अवैध व्यवसायात सक्रीय असणारा सराईत आरोपी नामे आनंद उर्फ गोलु देवशंकर वर्मा, वय ३० वर्षे, रा. वार्ड कं १, येरला याचेवर नागपुर ग्रामीण जिल्हा पोलीसांनी एम.पी.डी.ए कायदया अंतर्गत कारावाई करून त्याला स्थानबध्द केले आहे.
अवैध अंमली पदार्थ व्यापाऱ्याला एम.पी.डी.ए कायद्यानुसार स्थानबध्द केले









