spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सुख शांती समाधान संस्थेचा तेरावा वार्षिक उत्सव: वसुधैव कुटुंबकम

सुख शांती समाधान संस्था नागपूर या संस्थेचा 13 वा वार्षिक उत्सव ८ मे रोजी नुकताच कविवर्य सुरेशभट सभागृहात येथे संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष सचिन माथूरकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर निता ठाकरे, डॉ.प्रगती खळतकर स्त्रीरोग विशेषज्ञ आणि सीमा ढोमणे नेहरू झोन सभापती आणि नगर सेविकांनी भूषविले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि संपूर्ण शिबिरार्थींनी गायत्री मंत्र म्हणून झाले. समर्थ भजन मंडळानी गुरू वंदना सादर केली. संस्थेचा परिचय निर्मला यांनी करून दिला. सचिन माथूरकर यांनी गुरूवंदना संस्थेच्या टीम कडून घेतली. अजय सातफळे यांनी प्रास्ताविक तर सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुस्तक, मोमेंटो आणि बॅग देऊन सत्कार करण्यात आला. नागपूर शाखेचा अहवाल शिला केळापूरे यांनी आणि रायपूर शाखेचा अहवाल मीरा शर्मा यांनी कथन केला. निता ठाकरे आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की आजच्या व्यस्त जीवनात कार्य करीत असताना सुख शांती समाधान कसे मिळविता येईल ही संस्था हे मोलाचे कार्य करीत आहे. की सर्वांना उत्तम आरोग्य सोबत समाधानही मिळवून देत आहे. प्रगती खळतकर यांनी निवृत्तीच्या काळात स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायची आहार व्यायाम प्राणायाम कसा आणि कोणता याविषयी सविस्तर माहिती दिली. सीमा ढोमणे यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. हे कार्य असेच पुढे जावे अशी मनो कामना व्यक्त केली. सचिन माथूरकर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की कोणतेही कार्य करीत असताना चेहऱ्यावर हास्य असायला हवे हे हास्य ही आंतरिक आणि मानसिक सुखाची परिणीती असते म्हणूनच आसन प्राणायाम करीत असताना नेहमी चेहऱ्यावर हास्य असावे त्यानंतर लघु गृहोध्योगाचे उद्घाटन झाले. त्यानंतर वसुधैव कुटुंबकम या विषयावर शिबिरार्थी योग डेमो सादर केले यावेळी 17 प्रतियोगिता सादर झाल्यात निबंध स्पर्धेचे ही आयोजन केलेले होते विषय वसुधैव कुटुंबकम हाच होता

निबंध स्पर्धेत.

1 इंदिरा इघे शक्तिमतानगर

2.स्नेहल बोरीकर खापा

3.पद्म कुल भूषण जैन आर्यनगर

हे बक्षिसांचे मानकरी ठरलेत यानंतर योग डेमोचे मानकरी हे ठरलेत. या कार्यक्रमाचे आभार मोना पोतदार यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे संचालन अंकिता यांनी तर डेमोचे संचालन रंजना आणि उषा यांनी केले. प्रवास द्वारावर सुंदर रांगोळी मोना आणि सुजाता यांनी काढली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या टीमने जबाबदारीने पूर्ण कार्य करीत असते. लगेच कार्यक्रमानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असे सचिव शीला केळापूरे यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.