कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भिलगाव गावातील हस्तिनापूर परिसरातील एका मैदानातील निंबाच्या झाडाखाली थांबलेल्या 2 शालेय विद्यार्थ्यांवर वीज कडाडून पडल्याने एका शालेय विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर एक विद्यार्थी गंभीर जख्मि झाल्याची घटना आज सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली असून मृतक शालेय विद्यार्थ्यांचे नाव उज्वल सुनिल भेलावे वय 15 वर्षे रा तिवारी नगर भिलगाव असे आहे तर जख्मि विद्यार्थ्यांचे नाव देवाश कपूर पारधी वय 15 वर्षे रा भिलगाव कामठी असे आहे.सदर जख्मि विद्यार्थी कामठी च्या आशा हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर मृतक व जख्मि विद्यार्थी हे घरामागील मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळायला गेले असता अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी वादळी पावसाचा तडाखा झाला या पावसातून बचाव घेत लगतच्या निंबाच्या झाडाखाली उभे असता अचानक विज कडाडून निंबाच्या झाडावर पडल्याने या झाडाखाली थांबून असलेले दोन विद्यार्थ्यापैकी एक विद्यार्थी जागीच मरण पावला तर दूसरा जख्मि असून उपचार घेत आहे.,
घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घस्तनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.सदर मृतक हा 9 व्या वर्गातील विद्यार्थी असून जरीपटका येथिल महात्मा गांधी शाळेतील विदयार्थी आहे.मृतक विद्यार्थ्यच्या कुटुंबात आई वडील व एक भाऊ असा आप्तपरिवार आहे.या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.