नागपूर :- मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती व छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पूत्र छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात प्रभारी अपर आयुक्त सामान्य प्रशासन तुषार मठकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.