कन्हान :- सालवा रेल्वे स्टेशन येसंबा गेट जवळील सालवा शिवारात डाउन लाईनवरील खांब आणि अप लाईन वरील खांब यांच्या दरम्यान रेल्वेतुन खाली पडुन छत्तीसगड जिल्हा महासमुंद्र, ता. सरईपाली राह. बाना भाटा येथील ३५ वर्षीय महेंद्र जयकुमार यादव यांचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसानी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.
गुरूवार (दि.१४) मे २०२६ ला सकाळी ७ वाजता, फिर्यादी मनिष महेशचंद्र सक्सेना, वय ५८ वर्षे, धांडा रेल्वे ट्रॅक मेंटेनर, राह. प्लॉट नं. ४२, सुगाता नगर, नारी रोड, नागपुर हे नेहमीप्रमाणे कर्तव्यावर सालवा रेल्वे स्टेशनवर आले असता मुकदम विलास साकरे यांनी सांगितले की, ट्रेनमधुन पडुन कोणीतरी जख्मी अवस्थेत पडले आहे. तिथे जाऊन बघा, तिथे जावुन पाहिले तर डाउन लाईन पिलर क्र. ११०७/२४ आणि अप लाईन पिलर क्र. ११०७/२५ यांच्या दरम्यान दोन रेल्वे रुळांच्या मध्ये सुमारे ३५ वर्षांचा एक माणुस मृतावस्थेत पडलेला दिसला. त्याच्या मृतदेहा शेजारी एक निळ्या रंगाची बॅग होती. मृताच्या पॅन्टच्या खिशात रायपुर ते कोयंबतुरचे रेल्वे तिकीट होते आणि त्याच्या आधार कार्डवर धर्मेंद्र जयकुमार यादव वय ३५ वर्षे, बनोभाटा, सरईपाली, जिल्हा महासमुंद (छत्तीसगड) असे लिहिलेले होते. या घटनेची वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांनी पुढे रेल्वे सुरक्षा दलाला आणि रेल्वे सुरक्षा दलाने कन्हान पोलिसांना माहिती दिल्याने कन्हान पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपासासाठी मृतदेह ताब्यात घेऊन पोलिस मित्र तथा समाजसेवक अनिल आंबिलढुके यांना बोलावुन त्याचे टाटा एस क्र. एमएच ४० सी एम ७४२७ या चार चाकी वाहनात शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे पाठविण्यात आले. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी मनिष महेशचंद्र सक्सेना, वय ५८ वर्षे, रेल्वे ट्रॅक मेंटेनर, राह. सुगाता नगर, नारी रोड, नागपुर यांचा तक्रारीवरून पोलीसानी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.