spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिवांनी दिली शांती सदन महिला निवारा केंद्राला भेट

नागपूर :- केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय नवी दिल्लीच्या अतिरिक्त सचिव मोना खंदार यांनी गुरुवारी (ता.१४ )स्माईल प्रकल्पांतर्गत सदर येथील नागपूर महानगरपालिकेच्या शांती सदन महिला निवारा केंद्राला भेट दिली. याप्रंसगी समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशणी तेलगोटे, मनपाच्या समाज विकास विभागाचे विनय त्रिकोलवार यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन यांचे मार्गदर्शनात ‘स्माईल प्रकल्पांतर्गत 50 महिला भिक्षेकरी महिलाकरिता सदर येथे ‘शांती सदन महिला निवारा केंद्र आहे. यावेळी अतिरिक्त सचिव मोना खंदारे यांनी शांती सदन महिला निवारा केंद्रात भिक्षेकरी यांची काळजी आणि पुनर्वसनासाठी मनपाच्या समाज विकास विभागातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी  खंदार यांनी शांती सदन महिला निवारा केंद्रात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा आणि दिली जाणारी सर्वांगीण काळजी यांची प्रशंसा केली. तसेच, पुनर्वसनाचे एकूणच प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले. विशेषतः लाभार्थ्यांचे पुनर्वसन करून त्यांना सन्मान जनक रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचे अतिरिक्त सचिव मोना खंदार यांनी विशेष कौतुक केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.