spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा अलर्ट

– सकाळी 11 ते 4.30 वाजेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी नाही

– विद्यार्थी कामगार व नागरिकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने उपाययोजना करा

– विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या सूचना

– नागपूर व वर्धा जिल्ह्यात 16 ते 18 पर्यंत यलो अलर्ट

 नागपूर :- हवामान विभागाने विभागातील नागपूर वर्धा जिल्ह्यात संभाव्य उष्णतेची लाट ( हिट वेव्ह ) च्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी कामगार व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उष्णतेची लाट विभागासह नागपूर वर्धा जिल्ह्यात त्याची तीव्रता अधिक असल्याचे जाहीर केले असून विभागात करायच्या उपाययोजनाबाबत विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

हवामान विभागाच्या हिट वेव्ह संदर्भात सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत नागरिकांच्या संरक्षणासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये तसेच विद्यार्थी कामगार व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व आस्थापना व महाविद्यालयांनी आवश्यक उपाययोजना कराव्या असे सक्त निर्देश यावेळी देण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत सर्व जिल्हाधिकारी यांनी हिट वेव्ह उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपायोजना राबवताना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोल्ड वार्ड तयार करावे तसेच उष्णतेवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधीचा साठा तयार ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या

विभागात मे व जून महिन्यात उष्णते संदर्भात अलर्ट लागू राहणार आहे उष्माघातामुळे विभागात अतिदक्षता घेताना उष्मगाथाच्या रुग्णांवर प्राप्त तात्काळ उपचार होईल याची खबरदारी घेण्यात यावी उष्मघातासंदर्भात करावयाचे उपाय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी तसेच महानगरपालिका क्षेत्रात सेंटर होम सारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असेही यावेळी बैठकीत सांगण्यात आले.

नागपूर व चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात यासंदर्भात उपाय योजना लागू करण्यात आल्या असून नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक चौकात क्रीमनेट तसेच आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा शाळा महाविद्यालय कोचिंग सेंटर आदींना सूचना देण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर बीपी नितळकर यांनी यावेळी सांगितले.

नागपूर जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भात उपाय योजना लागू करण्यात आल्या असून या उपायोजना 16 जून पर्यंत लागू राहतील असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत सांगितले या बैठकीस वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली तसेच गोंदिया जिल्हा धिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दूरदृष्टी प्रणाली द्वारे जिल्ह्यात सुरू असलेल्या उपायोजनाबद्दल माहिती दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.