spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपातर्फे सायकल रॅली आणि सायकल एक्स्पोचे आयोजन

– आयुक्तांनी घेतला नियोजनाचा आढावा

नागपूर :- जागतिक सायकल दिनानिमित्त नागपूर महानगरपालीकेद्वारा भव्य सायकल रॅली आणि सायकल एक्स्पोचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आयुक्त डॉ. विपीन यांनी गुरुवारी (ता.१४) क्रीडा विभागाची महत्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत उपायुक्त सर्वश्री मिलिंद मेश्राम, निर्भय जैन, मंगेश खवले, गणेश राठोड, अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त सर्वश्री धनंजय जाधव, राजकुमार मेश्राम, प्रमोद वानखेडे, हरीश राऊत, विजय थूल, विकास रायबोले, संजय कांबळे, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) महेशकुमार ठाकूर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारत असतांना पर्यावरणात कार्बनचे उत्सर्जन कमी व्हावे आणि नागरिकांचे स्वास्थ्य देखील सुदृढ राहावे या उद्देशाने “शाश्वत भविष्या साठी एकत्र सायकल चालवणे” या संकल्पनेवर फिट इंडिया अंतर्गत ‘जागतिक सायकल दिनाचे’ औचित्यसाधून नागपूर महानगरपालिकेतर्फे रविवार ७ जून रोजी सकाळी ६ वाजता शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅली आणि सायकल एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत आयुक्त डॉ. विपीन यांनी या आयोजनासाठी आवश्यक ती संपूर्ण तयारी करून, योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी संपूर्ण नियोजनाची माहिती दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.