spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मौदा तालुक्यात पावसाळापूर्व शेती मशागतीच्या कामाला पहाटे चार वाजता पासून सुरुवात

किशोर साहू, मौदा :- यंदाच्या लग्नसराईच्या धुमधडाका संपत येत असून, अनेक शेतकऱ्यांनी पावसाळापूर्व शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केलेली आहे. शेतामध्ये ट्रॅक्टर व बैलबंडीच्या साह्याने शेणखत टाकायला सुरुवात झालेली आहे. अत्यंत तीव्र उन्हाळा लक्षात घेता पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंतच शेतकामे करत असल्याचे गुरुवार (ता. 14 मे )ला पहाटे पाच वाजता दरम्यान कोदामेंढी- मांगली (तेली) -अंजनगाव- धामणगाव मार्गे मौदा बसस्थानक येथे वृत्तपत्राच्या पार्सल आणायला जात असताना अंजनगाव येथील शेतकरी गणेश सारवे, अनिकेत मेंढेकर यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.