किशोर साहू, मौदा :- मौदा पंचायत समिती अंतर्गत येणारे जि प उच्च प्राथमिक शाळा नरसाळा येथे नुकतेच नवीन शाळा इमारतीचे हस्तांतरण, समारंभ व उद्घाटन सोहळा थाटात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने लाभलेले कार्यक्रमाचे उद्घाटक एनटीपीसी प्रकल्प प्रमुख जोसेफ बास्टियन, प्रमुख पाहुणे एनटीपीसी मौदाचे सॅम्युअल प्रशांत, दीपांसू ,स्मिता मिश्रा, राकेश वाघमारे , एम्पथी फाउंडेशन चे सीईओ एम आर सुंदरेश्वरण, सरपंच अजाब टेकाम, सचिव श्रद्धा सपाटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर ठाकरे, पंचायत समिती मौदा गटशिक्षणाधिकारी संकेत मरस्कोल्हे ,ज्येष्ठ विस्तार अधिकारी भक्तवर्ती, केंद्रप्रमुख अनिलकुमार पत्रे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व माजी विद्यार्थी संघ (शिवबा फाउंडेशन ) उपस्थित होते.![]()
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. त्यानंतर फोटोचे पूजन ,दीप प्रज्वलन, फीत लावून शाळेची पाहणी, स्टेजकडे प्रस्थान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आश्विन मेश्राम यांनी केले. मान्यवरांचे शाल, नारळ, बुके व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले .मुख्याध्यापिका सुनीता अशोक झाडे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य परसराम घारड, तंटामुक्त अध्यक्ष राष्ट्रपाल मेश्राम ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गजानन माहुरे व शिक्षिका गजबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन सुभाष बासिंगे यांनी मानले.