– संत्रा निर्यात सबसिडी रद्द करून शासनाचे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ !”
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- बांगलादेश सरकार ने महाराष्ट्रातील संत्रा फळांवर ८८ टका (बांग्लादेश करेन्सि मध्ये) आयात कर लादला त्यामुळेच संत्र्याच्या फळाचा भाव वधारला म्हणून महाराष्ट्रातुन निर्यात होणाऱ्या संत्र्याला ५० टक्के अनुदान देण्याची मागणी तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांनी २७ नोव्हेंबर २०२३ ला मुख्यमंत्री महोदयांना पत्र देऊन केली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ बैठक लावली व निर्यात शुल्कात सूट देण्याची योजना आखली व ७ डिसेंबर २०२३ शासनाने शासन निर्णय सुध्दा काढला त्या निर्णयाची लगेच अंबलबजावणी व्हावी म्हणून १८ डिसेंबर २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी लक्षवेधी लावून केली होती आणि तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या उत्तरात शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी प्रक्रिया संस्था, निर्णयातदार यांना अनुदान तात्काळ वाटप करण्याची सूचना माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी लक्षवेधी मध्ये मांडली व ती मंत्र्यांनी लगेचच मान्य केली त्यानंतर काही राजकीय पुढाऱ्यांनी हेतुपुरस्सर ही योजना बंद करण्याचा घाट घातला अनेक लेखी स्वरूपाच्या तक्रारी केल्या गेल्या त्यानंतर सुद्धा देवेंद्र भुयार यांनी ११ जून २०२५ ला मंजूर झालेली १७१ कोटी रुपयांची रक्कम लगेच शेतकऱ्यांना वाटप करा अशी उपमुख्यमंत्री महोदयांना पत्रा द्वारे विनंती केली परंतु १४ मे २०२६ ला राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे हक्काचे १७१ रुपये रद्द करण्याचा निर्णय कॅबिनेट ने घेतलेला आहे त्यामुळे हा वरुड मोर्शी तालुक्यातील शेकऱ्यांवर मोठा अन्याय आहे त्यामुळे या पुढे ही योजना कायमची बंद केल्या गेली आहे याचे याचे दुःख असल्याचे मत माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले असून आता तरी वरुड मोर्शी तालुक्यातील 50 हजार हेक्टर क्षेत्रावरील संत्रा उतपादक शेतकऱ्यांनी जागृत होऊन लढा उभारावा असे आवाहन माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना केले.
प्रतिक्रिया
बांगलादेश ला निर्यात होणाऱ्या संत्र्याला राज्य सरकार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७१ कोटी ची सबसिडी मंजूर केली त्याच दिवसा पासून भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रारी करणे चालू केले संत्रा उत्पादकांच भल न पाहणाऱ्या या आमदार व खासदारांना वठणीवर आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही याची त्यांनी जाणीव ठेवावी व भाजपा भक्तांनी आता तरी सावध व्हावे एवढीच माफक अपेक्षा व रद्द केलेले अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परत द्यावे.
— देवेंद्र भुयार माजी आमदार मोर्शी विधानसभा.