spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ड्रोनची कमाल :औषध फवारणी वेगवान होणार

– ड्रोन फवारणी’चे यशस्वी प्रात्यक्षिक

सचिन चौरसिया, रामटेक :- शेती करताना शेतकरी आता नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊ लागले आहेत. तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती अवजारांना फाटा देत आधुनिक अवजारे वापरण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. पाठीवर जड फवारणी पंप घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून फवारणीसाठी शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. त्याबरोबरच कीटकनाशकाची, पैशांची व वेळेची बचत होण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. तालुक्यातील मसला गावी कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाची राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, “पारंपरिक पद्धतीने पाठीवर जड पंप घेऊन फवारणी करताना एका एकरासाठी जिथे सव्वा ते दीड तास लागत असे आणि शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असे, तिथे ड्रोन तंत्रज्ञानामुळे वेळेची आणि पैशांची मोठी बचत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कामात सुलभता येऊन वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होण्यास मदत होणार आहे. मागील आठवड्यात शेत साहित्य उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन आधुनिक शेती, तंत्रज्ञानाचा वापर आणि ड्रोनच्या उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व पाहणी करण्यात आली. पाहणी केलेला ड्रोन हा १६ लिटर क्षमतेचा असून अवघ्या ७ ते ८ मिनिटांत सुमारे एक एकर क्षेत्रावर फवारणी करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने असे ड्रोन जास्तीत जास्त प्रमाणात रामटेक तालुक्यात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी मसला येथील शेतकरी केशव मोरे, चंद्रभान मदनकर, सचिन हटवार, भाऊराव गभणे, प्रवीण तारसाटे, सुमेश धावडे,सागर लोंढे, निलेश धावडे, महेश गभणे सह गावातील नागरिक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.