spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आचारसंहितेमुळे यवतमाळ येथील रोजगार मेळावा रद्द

यवतमाळ :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांच्या वतीने दि. २६ मे रोजी बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्ह रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ यांच्या दि. १८ मे २०२६ रोजीच्या पत्रान्वये जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार दि. २६ मे रोजी आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जाहीर केले आहे.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होणारे उद्योजक, उमेदवार तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांनी कळविले आहे.

Popular Articles