spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेमी क्लासिकल म्युझिक इव्हेंट चे आयोजन 24 मे रोजी सायंटिफिक सभागृहात

नागपूर :- स्वरदर्पण म्युझिक अकॅडमीच्या तर्फे ‘सेमी क्लासिकल म्युझिक इव्हेंट’चे आयोजन करण्यात आलेले असून हा विशेष संगीत सोहळा 24 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता. सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजिका डॉ. मिनाक्षी वाडबुध्दे यांच्या मार्गदर्शनात रसिकांना सुरेल संगीताची मेजवानी अनुभवता येणार आहे. अकॅडमीच्या माध्यमातून नवोदित विद्यार्थी व कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करण्यात येत आहे. यापूर्वीही अकॅडमीतर्फे ‘महाकाल के संग होली के रंग’, ‘घे भरारी मराठी गाण्यांची’ भाग 1 व 2, ‘दादा कोंडके स्पेशल’, ‘वतन के लिये’, तसेच ‘एक शाम शहीदों के नाम’ यांसारखे विविध कार्यक्रम यशस्वीरीत्या सादर करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून त्यातून प्रेरणा घेऊन हा नवीन संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात विविध नवोदित गायक-गायिका आपल्या सुरेल आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध करणार आहेत. संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. असे पत्रपरिषदेत डॉ. मिनाक्षी वाडबुद्धे यांनी सांगितले.

Popular Articles