spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पिंपरी-कन्हान येथे महिला व बालक आरोग्य जनजागृतीस समुपदेशन कार्यक्रम

– किशोरी मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाबाबत मार्गदर्शन

कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गुरुवार (दि.२१) मे ला अंगणवाडी क्रमांक १२६ ढिवरपुरा व अंगणवाडी क्रमांक ९८ पिपरी उपकेंद्र येथे महिलांचे व बालकांचे आरोग्य विषयक समुपदेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला परिसरातील महिला, किशोरी मुली, आशा स्वयंसेविका व नागरिकांनी मोठ्या संख्ये ने उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमात महिला व बालकल्याण अधिकारी निलेश तपासे यांनी महिलांच्या आरोग्य तपासण्या, पोषण, नियमित वैद्यकीय तपासणी तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देत महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी डॉ. पंकज पोजगे यांनी महिलां मध्ये वाढत असलेल्या कॅन्सरच्या धोक्याबाबत मार्गदर्शन करित किशोरी मुलीं ना १५ ते १६ वर्षे वयोगटात देण्यात येणाऱ्या कॅन्सर प्रतिबंधक लसीचे महत्त्व स्पष्ट केले. योग्य वेळी लसी करण व नियमित तपासणीमुळे गंभीर आजारांपासुन संरक्षण मिळु शकते असे त्यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका सुनिता मानकर यांनी महिलांना आरोग्य, स्व च्छता, पोषण व कॅन्सर प्रतिबंध याविषयी सविस्तर माहिती देत आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला नगरसेविका लता लुडुरे, नगरसेविका आशा महातो, एम.पी.डब्ल्यु. विलास साहारे, महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी, सर्व आशा स्वयंसेविका, मदतनीस तसेच गावातील महिला व किशोरी मुली उपस्थित होत्या. महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा समुपदेशन कार्यक्रमांची आवश्य कता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.