spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी नामनिर्देशन प्रक्रिया आजपासून

हंसराज, भंडारा :- भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया आज, सोमवार (२५ मे २०२६) पासून सुरू होत आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, भंडारा यांच्या कार्यालयात सादर करता येणार आहेत.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून २०२६ असून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी २ जून रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी भंडारा यांनी दिली.

Popular Articles