spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिरोंजीचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

खापा, वार्ताहर :-  व्ही. एस. पी. एम. अकॅडमी नागपूर द्वारा संचालित सिरोंजी स्थित महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ निकालामध्ये घवघवीत यश प्राप्त केले.

परीक्षेला एकूण अकरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी दहा विद्यार्थी १) पूर्वा श्रीकांत येडमे ७८ टक्के, २) अन्वेष रवींद्र आहाके ७६.६६ टक्के, ३) अंकिता राजेश कुमरे ७४.६६ टक्के, ४) गुंजन खलंसिंग खंडाते ७४ टक्के, ५) अर्पित रामु खुरसाम ७४ टक्के, ६) अंश दिनेश उईके ७२ टक्के, ७) रितिका बारक्या मलघाटे ७२ टक्के, ८) कार्तिक सचिन कोवे ७१.३३ टक्के, ९) मोनाली चंद्रभान कामोने ६७.३३ टक्के, १०) रुद्र रवींद्र नागापुरे ६५.३३ टक्के गुण घेत शिष्यवृत्ती करता पात्र ठरले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका व आपल्या माता, पालकांना दिले. विद्यालयाची कठोर मेहनत व परिश्रम सातत्याने विद्यार्थी हिताकरिता प्रयत्नशिल आहे. विद्यालयाने गुणवंतांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन याप्रसंगी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.