spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बौद्ध विवाहयोग्य युवक -युवती परिचय संमेलन 31 मे रोजी

नागपूर :- बौद्ध समाजामध्ये उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने बी.ई.डी.सी. (भीम एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट कौन्सिल) यांच्या वतीने “एक पहल – शादी भी, उद्योग भी” या संकल्पने अंतर्गत ५ वे बौद्ध विवाहयोग्य युवक- युवती परिचय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पूर्वी १० मे रोजी होणारे हे संमेलन आता ३१ मे रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या विशेष उपक्रमामध्ये उद्योजक युवक तसेच नोकरी करणाऱ्या, उद्योजक, शिक्षित व नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या किंवा उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या युवतींना सहभागी होता येणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट तसेच विविध क्षेत्रातील उच्च पात्रता असलेले युवक या संमेलनात सहभागी होऊ शकतात. हे संमेलन क्विन्स कोर्ट हॉल, दुसरा मजला, फॉर्च्यून मॉल, श्री शिवमच्या वर, झाशी राणी चौकाजवळ, सीताबर्डी, नागपूर येथे ३१ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडणार आहे. हभागासाठी नोंदणी शुल्क युवकांसाठी ७०० रुपये तर पालकांसाठी ५०० रुपये ठेवण्यात आले असून यात दुपारचे जेवण व चहाची व्यवस्था समाविष्ट आहे. प्रवेश केवळ नोंदणीकृत सहभागींसाठीच राहणार असून नोंदणी आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी रजनी खापर्डे (९०२२७-६६३४७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यासाठी BEDC टीमशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मीडिया पार्टनर म्हणून बहुजन सोर्स सहभागी आहे.

Popular Articles