spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

इंधन टंचाई व सततच्या दरवाढी विरोधात ओबीसी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारींना दिले निवेदन

नागपूर :- केंद्र सरकारचे चुकीच्या आर्थिक धोरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सध्या देशभरात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडर सतत च्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. त्यातच अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

आपणास विनंती आहे की, केंद्र सरकार कडे आमच्या मागण्यांचे निवेदन पाठवून त्वरीत दरवाढ कमी करावी.

प्रमुख मागण्या

१) पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तत्काळ कपात करावी.

२) नागपूर जिल्हासह राज्यभरातील इंधन टंचाई त्वरित दूर करण्यात यावी.

३) सर्व पेट्रोल पंपावर सुरळीत इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा.

४) महागाई नियंत्रणकरिता केंद्र सरकार ने ठोस उपाय योजना कराव्यात.

५) सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व छोट्या व्यावसायिकांना दिलासा देणारे निर्णय तातडीने घेण्यात यावे. बाबत आज दिनाक २६ मे रोजी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळांमध्ये मोरेश्वर भादे महासचिव, म. प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, अजय हटेवार राष्ट्रीय समन्वयक ओबीसी विभाग, चंद्रकांत हिंगे महासचिव, म. प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, विजया धोटे महासचिव, म. प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, प्रशांत पवार कार्याध्यक्ष नागपूर शहर ओबीसी विभाग, भूषण तल्हार कोषाध्यक्ष नागपूर शहर ओबीसी विभाग, प्रशांत आस्कर प्रवक्ता नागपूर शहर ओबीसी विभाग, सचिन निंबार्ते प्रदेश उपाध्यक्ष, अशोक निखाडे, माधव गावंडे दक्षिण नागपूर. अध्यक्ष, अरविंद क्षीरसागर कार्याध्यक्ष, मामा राऊत उपाध्यक्ष संतोष गोटफोडे महासचिव उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.