spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सियाराम मिल मृत कामगाराच्या आरोपीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा – कॉ. राजेंद्र साठे

– सियाराम मिल कंपनी गेटवर मृतक हेमराज हुकरे यांची श्रद्धांजली सभा पार पडली

सियाराम सिल्क मिल नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्र, अमरावती मधील हेमराज हुकरे नामक कामगाराचा कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे 14 मे रोजी अपघात होऊन 18 मे रोजी मृत्यू झाला. मृत्यूला जबाबदार कंपनी व्यवस्थापन व सुपरवायझर यांचे वर सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल करावा अशी मागणी कंपनी गेटवर झालेल्या वस्त्रोद्योग कामगार युनियन सी आय टी यू तर्फे घेण्यात आलेल्या शोक सभेत सिटू राज्य पदाधिकारी कॉ. राजेंद्र साठे यांनी वक्तव्य केले. त्यांनी पुढे सांगितले की हेमराज भोकरे यांची प्रकृती अद्यावत असल्यानंतर सुद्धा सुपरवायझर यांनी जोर जबरदस्ती करून आपल्या गाडीवर कंपनीत आणले मशीनवर उभे राहून काम करण्याकरता समर्थक असल्यामुळे त्यांनी तीनदा विभागीय व्यवस्थापक यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन विनंती केली त्यानंतर सुद्धा त्याच्यावर बळजबरी करून जबरदस्ती काम करण्यास भाग पाडले. त्यातून त्यला गोड येऊन मागे पडला व त्याच्या डोक्याला डबल धोका बनवून त्याचा मृत्यू झाला. या घटनेला कारणीभूत असलेल्या भिंतीवर कारवाई होण्यासोबतच त्याच्या परिवाराला 50 लाख रुपये सानुग्रह राशी व त्याच्या आईला दहा हजार रुपये महिना पेन्शन लागू करावे. अशी मागणी करण्यात आली.

श्रद्धांजली कार्यक्रमाला कॉ. प्रमोद कावळे, अमरावती सिटू जिल्हा कॉ. सचिव अंकुश वाघ, जिल्हा सहसचिव ओम प्रकाश वाघमारे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष निमकर, कामगार प्रतिनिधी आकाश बावणे, जमीर शेख, ज्ञानेश्वर गायकवाड, आशिष जामुनकर, श्याम टाले, विठ्ठल कुमरे सहा इतर कामगार प्रामुख्याने उपस्थित होते.

Popular Articles