spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिजाऊ शोध संस्थानचे काम त्वरित पूर्ण करा

– मनपा आयुक्त डॉ. विपीन यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर :- शहरातील महिला उद्योजकांच्या सशक्तीकरण व सक्षमीकरणासाठी मनपातर्फे उभारण्यात येत असलेल्या जिजाऊ स्मृती शोध संस्थानचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शंकरनगर मध्ये उभारण्यात येत असलेल्या जिजाऊ स्मृती शोध संस्थानच्या कामाची पाहणी आयुक्त डॉ. विपीन यांनी आज (ता. 27) केली. यावेळी कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, उपअभियंता आनंद मोखाडे, माजी महापौर नंदा जिचकार उपस्थित होते.

महिला उद्योजिकांसाठी मार्केटिंग हब व एक्झीबिशन सेंटर उभारण्यासाठी 36 कोटी 39 लाख रुपयांच्या सुधारित प्राकलनास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. जवळपास 3872 चौरस मीटर भूखंडावर 3387 चौरस मीटर जागेवर बांधकाम होणार आहे. हे केंद्र पाच मजली राहणार असून यात महिला उद्योजिकांसाठी प्रदर्शनी हॉल, ई-लायब्ररी, कार्यशाळा व प्रशिक्षणासाठी सभागृह राहणार आहे. त्याचप्रमाणे 200 आसनांच्या क्षमतेचे सभागृह व कॉन्फरन्स हॉल उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काही दुकानांसाठी सुद्धा जागा उपलब्ध राहणार आहे.

शहरातील महिला उद्योजिकांना बाजारपेठ तसेच आवश्यक कौशल्य प्राप्त व्हावे, या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ विपीन यांनी अधिकारी व कंत्राटदाराला दिले आहे. यासाठी आवश्यक निधी राज्य सरकारकडून मिळालेला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे यांनी यावेळी दिली.

शहरातील महिला उद्योजिकांसाठी जिजाऊ शोध संस्थान हे एक व्यासपीठ म्हणून उभे राहील. यामुळे शहरातील महिलांच्या सक्षमीकर व सबलीकरणासाठी महत्त्वाचे योगदान ठरणार असल्याचे यावेळी माजी महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.