spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रा.पियुष ढाले यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ प्रदान

– पांढरकवडा शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण.

पांढरकवडा :- स्थानिक श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा. पियुष विलासराव ढाले यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून इंग्रजी विषयात नुकतीच सर्वोच्च ‘पीएच.डी.’ (Ph.D.) पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे पांढरकवडा परिसरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रा. पियुष ढाले यांनी आपला हा महत्त्वपूर्ण शोधप्रबंध “ (भारतीय इंग्रजी लेखकांच्या साहित्यातील दलित पात्रांचे चित्रण) या विषयावर सादर केला होता. त्यांनी हे उत्कृष्ट संशोधन ज्येष्ठ व नामांकित मार्गदर्शक प्राचार्य डॉ. नावलेकर सर यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले.

दलित साहित्यातील संघर्षाचा सखोल वेध प्रा. ढाले यांनी आपल्या संशोधनामध्ये भारतीय इंग्रजी साहित्यात आलेल्या दलित पात्रांचे चित्रण नेमके कसे केले गेले आहे, याचे वास्तववादी विश्लेषण केले आहे. दलितांचे सामाजिक वास्तव, त्यांचे हक्क, मानवी संघर्ष आणि त्यांची अस्मिता या अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा त्यांनी आपल्या प्रबंधात सखोल अभ्यास केला आहे. त्यांचे हे संशोधन कार्य इंग्रजी साहित्य क्षेत्रासाठी अत्यंत मोलाचे व मार्गदर्शक ठरणार आहे. या यशाचे श्रेय देताना प्रा. पियुष ढाले यांनी आमदार श्री. अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांच्याकडून मिळालेल्या विशेष प्रोत्साहनाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. तसेच हे यश मिळवण्यात सातत्याने पाठबळ देणारे आपले आई-वडील, पत्नी, मुलगा, नातेवाईक आणि महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

प्रा. ढाले यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Popular Articles