नागपूर :- महानगरपालिका, धरमपेठ झोन क्र. ०२, अंतर्गत दि. 29/०5/2026 रोजी केलेल्या अतिक्रमण कारवाई , कलेक्टर कॉलनी सिविल लाईन, फुटाला रोड , सेमिनरी हिल्स, अमरावती रोड,वायुसेना नगर, तेलंगखेडी, रवी नगर चौक इत्यादी ठिकाणी कार्यवाही करण्यात आली . यापुढे अश्याच प्रकाराची मोठ्या प्रमाणात धरमपेठ झोनच्या विविध परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाईल. तसेच दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले असून रस्ते वाहतुकीस मोकळे करण्यात आले. इथुन पुढे पुन्हा पुन्हा त्याच जागी दुकाने लावणाऱ्या व्यक्ती विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सदर कारवाई आयुक्त मनपा नागपूर पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर कारवाई झोन क्र 2 चे सहा. आयुक्त आणि अतिक्रमण विभागाचे झोन कर्मचारी तसेच NDS पथकाद्वारे मोठ्या प्रमाणात सहभागी करून कारवाई करण्यात आली आहे.



