spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोच्छी शिवारात गळफास लावून तरुणाची आत्महत्या

खापा, वार्ताहर :- खापा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोच्छी (ता. सावनेर) येथील तरुणाने स्वतः शेतातील बोराचा झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवार (दि. २९ मे) सकाळी आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतकाचे नाव मिथुन लोभाजी बागडे (वय ३९), रा. कोच्छी, ता. सावनेर, असे आहे.

शेतकरी शेतात जात असताना त्यांना एक व्यक्ती बोरीच्या झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे त्यांनी गावातील पोलिस पाटलाच्या माध्यमातून पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला व समाजसेवक हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारा दरम्यान मृत घोषित केले. मृतदेहाचा शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन लेकराचा बाप असलेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने गावात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे.

मिथुन हा घरून घरच्यासाठी काही सामान आणण्याकरिता जात असल्याचे सांगून निघाला. गावात अशी ही कुजबुज आहे की, गावातील एका व्यक्तीसोबत त्याचा वाद झाल्यामुळे त्या व्यक्तीने गुरुवारला मृतकाचे विरोधात खापा पोलिस स्टेशन येथे तक्रार केली. या तकारीला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. खापा पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास गुंतागुंतीचा आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सत्य बाहेर येईल असे पोलिसांनी वर्तविले. पुढील ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात खापा पोलीस करीत आहे.

Popular Articles