spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल खरडा येथील युवती श्रावणी तांबुलकरचा मानव मंदिर येथे सत्कार

किशोर साहू, मौदा :- खरडा येथील संघर्षातून घडणारी, मेहनतीने वाढणारी, जिद्दीने लढणारी आणि शेवटी जिंकणारी युवती श्रावणी शामराव तांबूलकरची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तिच्या मानव मंदिर खरडा येथे शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. समस्त खरडा ग्रामवासीयांनी तिचे अभिनंदन केले आहे.

याप्रसंगी खरडा ग्रामपंचायत सदस्य तथा महान त्यागी बाबा जुमदेव यांचे सेवक मनोज तांबुलकर, रघुनाथ भिवगडे, सुरेंद्र तांबुलकर ,पवन वहिले, काशिनाथ भिवगडे, इस्तारू तांबूलकर, सेविका सुनीता तांबूलकर, सुनीता भिवगडे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular Articles