– रस्त्याशेजारी राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते भोजराज नन्होरे यांच्या आरोप
– कंत्राटदार अभि इंटरप्राईजेसकडे पोते व टँकरच्या तुटवडा तर नाही ना?
किशोर साहू, मौदा :- मौदा- तारसा- रामटेक या रस्त्याचे सिमेंटकरण करण्याचे काम ठिकठिकाणी सुरू असून, तारसा फाटा येथेही काम सुरू आहे. 22 मे ला गिट्टीच्या थरावर ड्रायलीन काँक्रीट टाकण्यात आले. ते ड्रायलीन काँक्रेट मजबूत होण्यासाठी त्यावर पोते हातरून तीव्र उन्हाळा लक्षात घेता टँकरने सकाळ, संध्याकाळ दोन वेळा पाणी मारणे गरजेचे असताना 28 मे पर्यंत त्याच्यावर ना पोते झाकले, ना टँकरने पाणी मारले, त्यामुळे ड्रायलीन काँक्रेट पूर्णपणे उखडून गेले, त्यामुळे या रस्त्या बांधकामाकडे संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप उखडलेला रस्ता दाखवत गुरुवार (ता.28 मे) रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान रस्त्या शेजारीच राहणाऱ्या तारसा फाटा येथील सामाजिक कार्यकर्ते भोजराज नन्होरे यांनी केला आहे.
धानला -रेवराल -कोदामेंढी या रस्त्याचे ठिकठिकाणी सीमेंटीकरणाचे काम सुरू असून, रेवराल येथील नाली बांधकाम करताना तेथेही नाली बांधकामाचे सिमेंटकरण मजबूत होण्यासाठी तीव्र उन्हाळा लक्षात घेता तेथे पोते झाकण्यात आलेले नाही. 

तसेच मागील एक वर्षापासून तोंडली- कोदामेंढी- बेरडेपार या रस्त्याचे ही सिमेंटकरण कासव गतीने सुरू असून रस्त्याचे सिमेंटकरण करताना तीव्र उन्हाळा लक्षात घेता पोते हातरून टॅंकरने दोनदा पाणी देणे अत्यंत गरजेचे असून, या रस्त्यावर तणस पसरवून पाणी दिले जात आहे, हवा आली की तणस आजूबाजूला उडून जात आहे. त्यामुळे पाणी सिमेंट रस्त्यावर व्यवस्थित शोषले जात नाही, त्यामुळे काम पूर्ण होण्यापूर्वी या रस्त्यावर भेगा पडायला सुरुवात झालेली आहे, असे माजी उपसरपंच सुरेंद्र बाभरे यांनी सांगितले.
वरील तिन्ही रस्त्याचे कंत्राटदार अभी इंटरप्राईजेस असून, या कंत्राटदाराकडे पोते व टँकरचा तुटवडा तर नाही ना? संबंधित नियंत्रण ठेवणाऱ्या अभियंत्यांनी व प्रशासन विभागाने विशेष लक्ष देऊन सुरू असलेल्या व प्रत्येक कामावर शेकडो करोडो रुपयाचे अंदाजपत्रक असलेल्या वरील तिन्ही रस्त्याचे सीमेंटीकरणाचे बांधकाम उत्कृष्ट करण्यासाठी विशेष लक्ष देण्याची मागणी तालुक्यातील या रस्त्यावरून आवागमन करणाऱ्या वाहनधारक, नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.








