कामठी :- 25 मे पासून सुरू झालेल्या नवतपाने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही केली त्यातच काल सायंकाळी 5 दरम्यान झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या पावसाने कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागाला चांगलेच झोडपले. ज्यामध्ये कामठी तालुक्यातील उमरी गावातील भोजराज परतेकी नामक इसमाचा जख्मि होऊन मृत्यू झाला. तसेच शैलेश वंजारी यांच्या मालकीचा एक बैल झाडाखाली मृत्युमुखी पडला. तसेच सावळी गावातील बऱ्याच घरावरच्या छतावरचे टिनाचे पत्रे उडाले.
काल झालेल्या वादळी पावसाने कामठी शहरालगत असलेल्या कामठी छावणी परिसरात वीज पडल्याने विद्दुत डीपी जळून खाक झाली .नागरिकांच्या घराचे टिनाचे पत्रे उडाले. तसेच ग्रामीण भागातही झाडे पडून,टिनाचे पत्रे उडून नागरिकांचे चांगलेच नुकसान झाले.या वादळी पावसाने नागरिकांना चांगलाच फटका बसला असून झालेल्या नुकसानीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.



