spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

म्यानमारच्या अध्यक्षांसह शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन

मुंबई :- म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग व त्यांच्या शिष्टमंडळाचे येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 11.30 वाजता आगमन झाले.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, म्यानमारचे भारतीय राजदूत अभय ठाकूर, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त मुंबई अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्यानमारचे महावाणिज्यदूत मोहनराव पिंपळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर सर्व मान्यवर नियोजित स्थळी रवाना झाले.

Popular Articles