spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपा आयुक्तांनी केली जनगणनेच्या कामाची पाहणी

– 10 जूनपर्यंत जनगणनेची कामे पूर्ण करण्याचे निर्देश

नागपूर :- 16 व्या राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर, देशपातळीवर राष्ट्रीय कार्य म्हणून राबविण्यात येणाऱ्या जनगणना प्रक्रियेतील प्रगणक व सुपरवायझरच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी सिव्हिल लाइन्स आणि पोलिस लाइन टाकळी येथे मनपा आयुक्त तथा जनगणना अधिकारी डॉ. विपीन यांनी आज (ता. 4) केली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकित, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी व उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, वृक्ष संवर्धक तथा सहायक जनगणना अधिकारी अमोल चौरपगार, उपअभियंता प्रशांत नेहारे पर्यवेक्षक अनिल पराडकर, अशोक खाडे, अग्रवाल यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार करणे व घरांची गणना (एचएलओ) करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना (पीई) केली जात आहे.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सिव्हिल लाइन्स आणि पोलिस लाइन टाकळी येथे भेट देऊन प्रगणक आणि सुपरवायझरमार्फत सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाचा आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्या. त्यांनी प्रगणकांकडून केल्या जाणाऱ्या ‘एचएलओ’ (HLO) ॲपचा वापर, मोबाईलमध्ये जनगणनेची माहिती भरताना येणाऱ्या अडचणी, इतर तांत्रिक अडचणी, तसेच दरदिवशी प्रगणकांकडून एकूण किती घरांची जनगणना होत आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी जनगणनेची कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Popular Articles