spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्रीसंत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम, सोमलवाडा, नागपूर ८ जूनपासून विवेक घळसासी यांच्या वाणीतून भागवत कथेचे आयोजन

– श्रीसंत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम, सोमलवाडा, नागपूर

– ८ जूनपासून विवेक घळसासी यांच्या वाणीतून भागवत कथेचे आयोजन

श्रीसंत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम नागपूर येथे अधिकमासा निमित्त श्री संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम, सोमलवाडा तर्फे श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सु-विख्यात कथावाचक अमृतवक्ता विवेक घळसासी हे आपल्या ओजस्वी वाणीतून भाविकांना श्रीमद् भागवत कथा ऐकवतील. कथा दिनांक ८ ते १४ जून पर्यंत दररोज सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० अशी राहील. तत्पूर्वी दररोज सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत अमरावतीचे संदीप पाध्ये गुरुजी श्रीमद् भागवत संहिता वाचन करतील. अमर कुळकर्णी व सहकारी संगीत संगत करतील.

अमृतवक्ता विवेक घळसासी हे सप्ताहांतर्गत सोमवार ८ जूनला भागवत कथा महात्म्य व परिक्षीत संवाद, ९ ला कपिल अवतार व धृव चरित्र, १० ला जड भरत कथा, प्रल्हाद चरित्र आणि वामन अवतार, ११ ला श्रीकृष्ण जन्म, १२ ला गोवर्धन लीला, दहिहंडी, छप्पनभोग, १३ ला रासलीला व रुक्मिणी स्वयंवर यावर प्रकाश टाकतील. १४ जूनल कथेची वेळ सकाळी ९ ते १२ अशी राहणार असून यावेळी घळसासी हे सुदामा चरित्रावर प्रवचन करतील. १४ जूनला दुपारी १२ ते १ या वेळेत आश्रमाच्या आतील परिसरात महाआरती, ग्रंथ पूजन व ग्रंथ मिरवणूक असे कार्यक्रम होतील. दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसाद वितरण होऊन सप्ताहाची सांगता होईल. भाविकांनी श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Popular Articles