कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर बॉयपास रोड व नागपुर हावडा रेल्वे उडाण पुलालगत खंडाळा शिवारातील शेतातील विहिरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळुन आल्याने चांगलीच खळबळ उडाली असुन मृत तरूणी की, महिला असल्याचे कळु शकले नाही.
गुरूवार (दि.४) जून २०२६ ला दुपारी कन्हान हद्दीतील नागपुर बॉयपास उडाण पुल रोड व रेल्वे लाईन लगत खंडाळा शिवारात शेतमालक रमेश अग्रवाल यांच्या शेतात निर्जन स्थळी विहिरीत एका महिलेचे प्रेत तरंगताना शेजारी असलेल्या गोट फार्म मालक विनोद यादव यांच्या मजुराला दिसल्याने विनोद यादव यांनी कन्हान पोलिसाना माहिती दिली असता कन्हान पोलि सांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन विहिरीत मृतदेह दिसल्याने पोलीस मित्र अनिल आंबागडे यास बोलावुन त्यानी आपल्या सहका-याच्या मदतीने महिलेचे मृत्य शरीर विहिरी बाहेर काढुन त्याचे टाटा एस क्र. एमएच ४० सी एम ७४२७ या चारचाकी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे शवविच्छेदन करीता पाठविण्यात आला. 
मृतदेह फुगून सडक्या अवस्थेत असल्याने महिला अल्पवयीन होती की सधन्यान हे अजुन कळले नाही, तिच्या शरीरावर तपकीरी कथ्या रंगाचा सलवार असुन पायजमा मात्र नव्हता तसेच त्या निर्जन विहिरीच्या बाजुला तीन खोल्यांचे घर बिना दरवाजे खिडक्याचे होते. एका खोलीत दुपट्टे वैगेरे अंथरले होते, यावरून त्या अज्ञात महिलेशी बळजबरी करून तिची हत्या करून संपविण्याच्या दृष्टीने विहिरीत फेकुन दिले असावे अशी दाट शक्यता नाकारता येत नाही, कन्हान पोलीस स्टेशन ला बातमी लिहे स्तवर प्रकरण दाखल झाले नसुन पुढील तपास कन्हान पोलीस करत असुन या मागील सत्य शवविच्छेदना नंतरच कळेल ?



