spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मिहान-चिंचभुवन उड्डाणपूल प्रकल्पाला वेग वाहतूक कोंडीवर प्रभावी नियंत्रण

नागपूर :- शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेल्या ६१९ कोटी रुपयांच्या मिहान-चिंचभुवन इंटरचेंज उड्डाणपूल प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. वर्धा रोडवरील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे मानले जात आहे.

विशेष बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असतानाही या मार्गावरील वाहतूक कोंडी तुलनेने नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था, नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्थापन आणि पोलिसांचा समन्वय यामुळे नागरिकांना अपेक्षेपेक्षा कमी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.

मिहान, विमानतळ, मेट्रो स्टेशन तसेच शहराच्या दक्षिण भागाला जोडणाऱ्या या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून, नागपूरच्या वाढत्या वाहतूक गरजांसाठी हा उड्डाणपूल महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Popular Articles