spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

इलेक्ट्रो होमिओपॅथी डॉक्टरांची कार्यशाळा

नागपूर २८ :  रॅबिसन इंडिया आणि त्रिदेवी इलेक्ट्रो होमिओपॅथी एजन्सी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर आणि ग्रामीण भागातील डॉक्टरांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर आयोजन २५ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बेसा रोड मानेवाडा नागपूर येथील यश इलेक्ट्रो होमिओपॅथी अँड रिसर्च सेंटर येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई येथील डॉ. प्रजापती यांच्या हस्ते झाले. डॉ. शुभांगी चौधरी, डॉ. नाना सेलोकर इत्यादी प्रमुख म्हणून उपस्थित होते.

आतापर्यंत च्या या २२ व्या कार्यशाळेत “मेंदूचे शरीरशास्त्र आणि शरीरक्रियाविज्ञान”  (एनाटॉमी एंड फिजिओलॉजी ऑफ ब्रेन) या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यशाळेत वक्त्यांनी इलेक्ट्रोपॅथी थेरपी चा वापर करतांनी विविध असाध्य आजारांसाठी औषधांची निवड कशी करावी याबद्दलचे मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.नानाभाऊ सेलोकर, डॉ.लता खोकले, डॉ.अर्पिता चन्ने, डॉ.स्मिता मुदलीयार, डॉ.शुभांगी चौधरी, मोटघरे मॅडम, डॉ.नितनवरे, डॉ.योगेंद्र वरकडे, डॉ.दीपक भास्कर,  डॉ. अरविंद मंडळ, डॉ.सतीश कांबळे, डॉ.एम.कुमार, लता नितनवरे, डॉ.संगीता शर्मा, अर्चना जैन, किरण काकडे, यश सेलोकर, नंदा सेलोकर, आदींसह विविध शहरातील व ग्रामीण भागातील डॉक्टरांची मोठी उपस्थिती होती


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.