कामठी :- दिनांक -०५/०६/२०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिना निमित्य उपजिल्हा रुग्णालय कामठी यांचे विद्यमाने पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
या दिवसाचा उद्देश पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे आणि निसर्ग संवर्धनासाठी लोकांना प्रेरित करणे हा आहे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, वृक्षसंवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने परिसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला .
सदर प्रसंगी नगरसेविका दिव्या गायधने,व कमलेश शर्मा सामाजिक कार्यकर्ते ,वैद्यकिय अधिक्षक डॉ.निशांत शेख मॅडम ,डॉ.सुरेश मोटे तालुका आरोग्य अधिकारी,व सर्व उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.








