spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नाल्यात पडून ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, गावात शोककळा

 

भंडारा २८ : भंडारा जिल्ह्यातील कुडेगाव येथे रविवार, २७ जुलै रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. घराशेजारील नाल्याच्या काठावर बसलेला सुशांत ईश्वर उपरीकर (वय ३ वर्षे) नावाचा चिमुकला तोल जाऊन नाल्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतची आई त्याला नाल्याच्या काठी शौचास बसवून पाणी आणायला गेली होती. त्याचवेळी सुशांतचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. नाला दुथडी भरून वाहत असल्याने सुशांत पाण्याचा जोरदार प्रवाह सुमारे २०० मीटरपर्यंत वाहत गेला. आई परत आल्यावर तिला मुलगा दिसला नाही आणि ती ओरडली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावले आणि शोधकार्य सुरू झाले. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलाचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कुडेगाव गावात शोककळा पसरली आहे. सुशांत हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्या अचानक मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची ही पहिलीच घटना असल्याने तालुका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. गावकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती विभागाला या प्रकरणाची दखल घेऊन पीडित कुटुंबाला आवश्यक मदत देण्याची मागणी केली आहे.

Popular Articles