कन्हान :- महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा ” शिवराज्यभिषेक सोहळा ” टेकाडी गाव येथे शिव छत्रपती प्रतिष्ठान व शिवप्रेमी व्दारे भगवे झेंडे लावुन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार, पुष्प अर्पण व दिपप्रज्वलित करून मानवंदना देऊन शिव राज्यभिषेक सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
शनिवार दि.६ जून २०२६ ला टेकाडी येथे राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान ” च्या वतीने शिवराय मनामनात, शिवराय घराघरात ” या उपक्रमांतर्गत गावात दर वर्षी प्रमाणे हनुमान मंदीर चौक टेकाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सुरेश मोहाडे, रविंद्र गणोरकर, हरिश्चंद्र ठाकरे, गोविंद शेंदरे, शिवनारायण आकोटकर, शिवशंकर आकोटकर यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण आणि दिपप्रज्वलित करून ” शिवाजी महाराजांचा जयघोष व जय,जयकार करून शिवराज्यभिषेक सोहळा थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गणेश मस्के, सुधाकर राऊळकर, राजेश मोरे, नत्थुजी कांबळे, प्रमोद मोरे, उमेश मोरे, अंकित लक्षणे, सचिन वाघमारे, सचिन भोयर, रामकृ ष्ण पावडे, संजय वासाडे सह मान्यवर मंडळी आणि शिवप्रेमी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.







