spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पत्रकाराच्या फॉर्महाऊसवरील जुगार अड्यावर धाड ,सहा जुगारी ताब्यात,49 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड रोड वरील मडी मंदिर जवळील पत्रकार मोहन ठाकूर यांच्या फॉर्महाऊस वर गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून घटनास्थळाहूंन 52 तास पत्ते, नगदी 2690 रुपये, चार महागडे मोबाईल एक किपेड असा एकूण 49 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही यशस्वी कारवाई काल सायंकाळी साडे पाच दरम्यान करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जुगाऱ्यात देवानंद पुरुषोत्तम कांबळे वय 54 वर्षे रा रमानगर कामठी,सचिन कमल बन्सोड वय 42 वर्षे रा रमानगर कामठी,ऋषभ अनिल पाटील वय 32 वर्षे रा रमानगर कामठी , सुनील तुळशीराम गजभिये वय 49 वर्षे रा भीमनगर कामठी, रितेश दिगंबर मेश्राम वय 45 वर्षे रा भीमनगर कामठी,प्रवीण जगर कारेमोरे वय 42 वर्षे रा खसाळा कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलिस पथकाने केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.