खापा, वार्ताहर :- खापा पोलिस स्टेशन हद्दीतील टेंभुरडोह येथील ३७ वर्षीय इसमाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दादाराव मधुकर रंगारी हा सावनेर तालुक्यातील टेंभुरडोह गावातील रहिवासी आहे. ही घटना सोमवार, ८ जून रोजी सकाळी ६ वाजता घडली. खापा पोलिसांनी मृत व्यक्तीचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी दादाराव यांचे कुटुंबीय घरातील कामे करत होते. दादाराव खोलीत एकटाच होते. त्यांने छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. थोड्याच वेळात दादाराव यांची आई त्यांना चहा देण्यासाठी खोलीत गेली तेव्हा त्यांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हे बघून आईने आरडा ओरड केली हे ऐकून शेजारी मदतीसाठी धावले. तोपर्यंत दादाराव यांचा मृत्यू झाला होता. ही बातमी मिळताच ठाणेदार किशोर भुजाडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा तयार केल्यानंतर, हितज्योती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हितेश दादा बन्सोड यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावनेरला पाठविण्यात आला. दादाराव हा विवाहित होता. दादारावच्या अवकाळी मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे कारण अज्ञात असून त्या दिशेने खापा पोलीस पुढील तपास करीत आहे.







