spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उपक्रम, खापा पोलिसांतर्फे शहरात सायकल रॅली, ‘खेलो इंडिया’, ‘सायकल ऑन संडे’, ‘फिट इंडिया हेल्दी इंडिया’

खापा, वार्ताहर :- जागतिक सायकल दिनानिमित्त खापा पोलिस स्टेशनच्या वतीने रविवारी (दि. ७) सकाळी सहा वाजता शहरात सायकल रॅलीचे आयोजन करून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. ‘खेलो इंडिया’ सायकल ऑन संडे, फिट इंडिया हेल्दी इंडिया’ उपक्रमांतर्गत आयोजित या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम राबवून नागरिकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण करणे, आरोग्य व तंदुरुस्ती बाबत जनजागृती तसेच पर्यावरण पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. पोलिस स्टेशन परिसरातून ही रॅली सुरू करण्यात आली. गुमगाव माईन, बस स्टॅन्ड, बाजार चौक ते परत पोलिस स्टेशन अशी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.

खापा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर भुजाडे यांनी सायकलिंगचे फायदे सांगताना स्पष्ट केले की, नियमित सायकल चालविल्याने शारीरिक तंदुरुस्ती टिकून राहते, हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि इंधनाची बचत होऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो.

या जनजागृती रॅलीमध्ये पी एस आय जगदीश पालीवाल, सचिन जंगम, मयुर डोंगरे, गोपनीय विभागाचे नितेश चिपडे, नारायण बोरकर, परवेज शेख, राहुल रेवतकर, शाम सोळंकी, विशाल महालकर, यांच्यासह आदी पोलिस अधिकारी, कर्मचारी, अंमलदार, पोलिस पाटील, होमगार्ड आणि शहरातील नागरिक सायकलसह सहभागी झाले होते. या उपक्रमातून आरोग्य फिटनेस आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.