spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ॲड. प्रभाकर मारपकवार यांच्या निधनाने एक सच्चा सहकारी हरपला

– श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्यातर्फे श्रद्धांजली

नागपूर :- नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी कायदे सल्लागार आणि पत्रकार संघ तसेच टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि प्रेस क्लबचे हितचिंतक अँड. प्रभाकर मारपकवार यांच्या आकस्मिक निधनाने वरील संस्थांची हानी झाली.

त्यांनी संघटनेला वेळोवेळी कायदेविषयक सल्याबाबत व मार्गदर्शन अतिशय मोलाचे होते.

पत्रकार संघाने 1982 / 83 मध्ये, विदर्भ एक्सप्रेस सुरू करण्यासाठी पत्रकार संघाने उभारलेल्या आंदोलनात ते पूर्णपणे सहभागी झाले होते. कामगार संघटना कायदे विषयांची सखोल जाण असणारा एक सच्चा सहकारी हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अशा शब्दात नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि प्रेस क्लबचे पदाधिकारी सर्वश्री प्रदीप कुमार मैत्र, ब्रह्माशंकर त्रिपाठी, अनुपम सोनी, विश्वास इंदूरकर, विनोद देशमुख, प्रभाकर दुपारे, जोसेफ राव यांनी संयुक्तपणे आपल्या श्रद्धांजली वक्तव्यात म्हटले असून अँड. मारपकवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.