– रामटेक, चंद्रपूर येथे स्वच्छता
– राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त उपक्रम
नागपूर :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सारथी (पुणे) च्या नागपूर विभागीय कार्यालयातर्फे ६ ते ९ जून २०२६ या कालावधीत गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे जतन, स्वच्छता आणि पर्यावरण संवधर्नाचा संदेश देण्याच्या उद्देशाने आयोजित या मोहिमेत नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या विद्यापीठांधील सारथी, पीएचडी अधिछात्रवृत्तीधारक संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 6 जून रोजी शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून रामटेक येथील ऐतिहासिक नगरधन किल्ला परिसरात राष्ट्र्संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक तसेच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा येथील संशोधक विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा संकलित केला.
7 तारखेला गोंडवाना विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी चंद्रपूर येथील ऐतिहासिक गोंड राजा किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. यात प्लस्टिक, काच, अल्युमिनियम साहित्य तसेच इतर कचऱ्याचा समावेश होता. संकलित कचऱ्याची स्थानिक ग्रामपंचायत व महापालिका प्रशासनामार्फत विल्हेवाट लावण्यात आली आहे. हा उपक्रम सारथी पुणेचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील तसेच नागपूर विभागीय कार्यालयाचे उपव्यवस्थापकीय संचालक विजय पवार यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.








