spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोदी सरकारच्या द्वादश वर्षपूर्ती निमित्त कल्याणेश्वर मंदिरात महाआरतीद्वारे भाविकांनी केला शिवभक्तीचा जागर !

नागपूर :- भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला द्वादश ( १२ ) वर्षपूर्ती निमित्त सेवा समर्पण च्या माध्यमातून भक्तीचा जागर महाल मध्य मंडळ व भाजपा आध्यात्मिक आघाडी व कल्याणेश्वर शयन आरती सेवा समिती महाल याचे द्वारे कल्याणेश्वर मंदिर येथे भाजप महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचे हस्ते शिवलिंगावर मंगल अभिषेक,शिवमहिम्न पाठ आणि महाआरती चे आयोजन करण्यात आले.

यासोबतच तेलांखेडी हनुमान मंदिर,हनुमान मंदिर, नरेंद्र नगर, श्री गजानन महाराज मंदिर उदय नगर, काळाराम मंदिर चंदन नगर , नवदुर्गा माता मंडळ, खरबी,नवग्रह मंदिर त्रिमूर्ती नगर , श्रीराम मंदिरटिळक पुतळा, महाल, अहिल्या मंदिर, धन्तोली याठिकाणी उत्साहात महा आरती संपन्न झाली. कार्यक्रमाचे संयोजन भाजपा आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले असून याप्रसंगी महाल मध्य मंडळ अध्यक्ष अनिल मानापुरे, महिला मोर्चा अध्यक्ष श्वेता निकम, नगरसेवक बंडू राऊत, वैशाली उदापुरकर, सारिका नांदूरकर, डॉ सुभाष राऊत, सुजाता कथोटे, अभिजीत कथले, सोमुजी देशपांडे, महामंत्री पंकज साळुंके, आणि भाजपचे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.

Popular Articles