spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्यात ‘मोदी सरकारची १२ वर्षे’ विषयावर चित्रकला स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांनी चित्रातून मांडला विकासाचा प्रवास

हंसराज,भंडारा :- भारतीय जनता पार्टी, भंडारा शहर यांच्या वतीने “मोदी सरकारची १२ वर्षे : विश्वास, विकास व जनकल्याण” या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भंडारा शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोदी सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना, देशात झालेली प्रगती आणि महत्त्वाची विकासकामे आपल्या चित्रांच्या माध्यमातून अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मांडली. कीर्तीताई रेबे यांनी परीक्षक म्हणून या संपूर्ण स्पर्धेचे बारकाईने निरीक्षण केले.

चित्रकला स्पर्धेत श्रुती गभणे हिने प्रथम क्रमांक पटकावला. मंजिरी वंजारी हिने द्वितीय, तर आरोही चौधरी हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, जिल्हा महामंत्री कल्यानी निखाडे, जिल्हा महामंत्री मयूर बिसेन, कोषाध्यक्ष चैतन्य उमाळकर, शहराध्यक्ष सचिन कुंभलकर आणि नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, मुकेश थानथराटे, रुबी चढ्ढा, प्रशांत निंबोडकर, रौनक उजवणे, श्रद्धा डोंगरे, रोशनी पडोळे, माधुरी तुमाने, राजकुमार भोजवानी, प्रदीप साठवणे, मंगेश वंजारी, अजय ब्राह्मणकर, वृषाली ब्राह्मणकर, गजानन घोम, ललिता टेंभरे व कीर्ती रेबे यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शहरातील शैक्षणिक क्षेत्रात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.