spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हाळगाव (सोनुली) येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन उद्या 

प्रफुल मेश्राम, नागभीड :- आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी उद्या 12 जून रोजी कन्हाळगाव (सोनुली) ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

गावातील पात्र मतदार, इच्छुक उमेदवार व नागरिकांनी या ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाने जाहीर केलेल्या नोटीसीनुसार उद्या 12 जून रोजी  दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.

या ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) तसेच महिलांसाठी राखीव जागांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधित प्रभागांमधील आरक्षणाची अंतिम निश्चिती सोडतीद्वारे केली जाणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.