spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महापुरुषांचे स्मारक, पुतळे व सभागृहांसाठी जागेचा प्रश्न मार्गी लागणार

Ø मंत्री डॉ.अशोक उईके यांनी घेतला सविस्तर आढावा

Ø तातडीने कार्यवाहीचे निर्देश

यवतमाळ :- राळेगाव विधानसभा मतदारसंघातील व यवतमाळ शहरातील विविध महापुरुषांची स्मारके, पुतळे तसेच सभागृहांसाठी जागेविषयी आदिवासी विकासमंत्री ना. डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक पार पडली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी विकास मीना, नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राळेगाव विधानसभा व यवतमाळ परिसरातील विविध महापुरुषांची स्मारके, पुतळे तसेच सभागृहांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करुन तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री डॉ.अशोक उईके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या आढावा बैठकीमुळे राळेगाव व यवतमाळमधील महापुरुषांचे स्मारक, पुतळे व सभागृहांसाठी जागेचा प्रश्न मार्गी लागण्यास गती मिळणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.